- December 19, 2024
- No Comment
नामांकित शाळेतील 10 व 11 वर्षांच्या मुलांवर 39 वर्षाच्या डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड
वारजे: शाळेतील अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्या एका डान्स टिचरला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
वारजे परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये ९ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. शाळेतील डान्स टिचरने ११ व १० वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार केला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा शिक्षक त्रास देत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्यांने केली आहे. ३९ वर्षाचा हा डान्स टिचर गेली दोन वर्षांपासून या शाळेमध्ये शिकवत होता.
या घटनेत वारजे माळवाडी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना पुढे आल्याने संबंधित शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे शाळेने काल रात्री सर्व पालकांना मेसेज पाठवून आज शाळा बंद राहणार असल्याची सूचना दिली. दरम्यान, अनेक पालक शाळेबाहेर जमले आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, या घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जेव्हा हा प्रकार समोर आला, त्यानंतर शाळेच्या प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. या डान्स टिचरला निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी डान्स टिचरला अटक केली आहे.