- December 21, 2024
- No Comment
मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
चाकण: त्राच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेण्याची घटना मुटकेवाडी चाकण येथे घडली आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा शारीरिक व मानसिक छळ तिच्या मित्राने केला. सततच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने गुरुवारी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी आरोपी मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका असे या मयत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 ते 19 डिसेंबर 2024 पर्यंत आरोपी ने फिर्यादीच्या बहिणीला लग्नाचे आमिष दाखवत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल घेत स्वतःचा जीव गळफास घेऊन संपविला. तिने या बाबत चिट्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांना मृतदेह सोबत ही चिट्ठी हाती लागली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.