- December 21, 2024
- No Comment
किरकोळ वादात तरुणीला लोखंडी हॅमरने बेदम मारहाण; मित्र आला ‘गोत्यात’
चाकण: अनेक दिवस मैत्री केल्यानंतर तरुणीने मित्राला माझ्याशी लग्न कधी करणार असे विचारले. त्यावर त्याने नकार देत लोखंडी हॅमरने मारहाण करुन तिला जखमी केले.
याबाबत एका तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक हेमंत लेडघर (वय २४, रा. राणुबाई मळा, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चाकणमधील मार्केटयार्ड चौकातील रुद्राक्ष हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी ४ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी अभिषेक लेडघर हा फिर्यादीचा मित्र आहे. तो रुद्राक्ष हॉटेलसमोर उभा होता. फिर्यादी या तेथे गेल्या. त्यांनी अभिषेक याला तू माझ्याशी कधी लग्न करणार असे विचारले. त्यावर त्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून लोखंडी हैमरने तिच्या उजव्या हातावर, डोक्यात मारहाण करुन जखमी केली. तिच्या जुपिटर दुचाकी गाडीवरही हैमरने मारुन तिचे नुकसान केले. फिर्यादी यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर जय हिंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.पुढिल तपास पोलीस हवालदार रेंगडे करीत आहेत.