कल्याणच्या मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश गजाआड
- क्राईम
- December 21, 2024
- No Comment
कल्याण: पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस परिसरात मराठी कुटुंबाला मारहाण करणारा निलंबित सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाला अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर त्याचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटले. अखिलेशला तात्काळ निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, 20 डिसेंबर) विधान परिषदेत केली.
अजमेरा सोसायटीत झालेल्या मारहाणीनंतर अखिलेश फरार होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी जोरदार मोहीम सुरु केली होती. तो टिटवाळा ते शहाड परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत अखिलेशला अटक केली.
या प्रकरणात जखमी अभिजित देशमुखांचा जबाब तसंच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार अखिलेशवरील कलमं वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती कल्याण डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.