• February 18, 2024
  • No Comment

उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणीला अटक

उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणीला अटक

    पुणे : उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तर व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून इंजेक्शनच्या 46 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्वारगेट येथील सोलापूर एसटी स्टँड येथे केली.

    याबाबत पोलीस अंमलदार प्रविण बाळासाहेब गोडसे (वय-31) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निकिता शशीकांत जाधव (रा. सह्याद्री हॉस्पीटल जवळ, बिबवेवाडी गावठान, पुणे) व दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 276, 336, 328, 34 नुसार गुन्हा दाखल करुन निकिता जाधव हिला अटक केली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकिता हिने तिच्या नावावर 15 हजार 400 रुपयांच्या मेफेनटरमाइन इंजेक्शन आयपी 46 बाटल्या मागवल्या होत्या. तिने या बाटल्या दोन अल्पवयीन मुलांना विक्री करण्यासाठी दिल्या होत्या. आरोपींकडे इंजेक्शन खरेदी केलेल्या बाटल्यांचे खरेदी केलेले बिल नव्हते. या इंजेक्शनचे दुष्परिणाम होऊन, इंजेक्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका किंवा आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना आरोपींनी मेफेनटरमाइन इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगताना पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *