• February 18, 2024
  • No Comment

तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व बलात्कार

तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व बलात्कार

    पुणे : तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने कारमधून पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेआठ ते शुक्रवारी (दि. १६) सकाळी साडेआठच्या दरम्यान खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप व दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

    वाघोली येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी ता. हवेली) आणि अमोल जाधव (रा. लोणीकंद ता. हवेली) यांच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्ट आणि अॅट्रोसीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता गुरुवारी सकाळी खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप येथे जात होती. त्यावेळी अचानक एक चारचाकी (एमएच १२ व्हीएफ २६४८) तिच्याजवळ येऊन थांबली. आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवला.

    तिचे अपहरण करुन आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ करुन दुसऱ्या दिवशी तुळापुर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले. यानंतर तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *