- February 18, 2024
- No Comment
लोणीकंद पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार
लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार गौरव ऊर्फ गोटया महादेव सातव वय. ३१ वर्षे रा. डोमखेलवस्ती आव्हाळवाडी ता. हवेली जि. पुणे व महेंद्र संभाजी कुटे वय. ३८ वर्षे रा. आव्हाळवाडी ता. हवेली जि. पुणे यांस पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन अनुक्रमे दीड वर्षाकरीता व एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमांवर मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी सदर सराईत इसम यांचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त श्री. विजयकुमार मगर यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री विजयकुमार मगर यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन अनुक्रमे दीड वर्षे व एक वर्षाकरीता तडीपार कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त साो. श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त सो. श्री.
विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. संजय पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित
काइंगडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे.सदरचे तडीपार इसम हे पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्यांची माहीती लोणीकंद पोलीस
स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक श्री कैलास करे यांनी केले आहे.