- February 19, 2024
- No Comment
बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक, पुण्यातील हिंजवडीतील घटना
पुणे : फर्जी या बेवसिरीजप्रमाणे तीन तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा छापल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. आयटी पार्क हिंजवडी परिसरात या बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, या तिघांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत
घरातच या नोटा छापल्या पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहता यामध्ये परराज्य अथवा परदेशातील काही लोकांचा सहभाग आहे का हे पडताळून पाहिले जात आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली. अभिषेक राजेंद्र काकडे (वय 20), ओंकार रामकृष्ण टेकम (वय 18, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.