- October 1, 2022
- No Comment
दोन हाणा पण पुढारी म्हणा,नवरात्रात आरत्यांना बोलवा रे….
पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पुण्यात गल्लोगल्ली भावी नगरसेवक दिसु लागलेत. गुडघ्याला बाशिंग बांधून जसा नवरदेव तयार असतो तसा भावी नगरसेवक रस्त्यारस्त्यावर दिसु लागलेत.बॅनरबाजीन तर अक्षरशः शहर विद्रूप करुन ठेवलय,प्रत्येक मंडळात आपला संपर्क कसा राहील,आपला फ्लेक्स कसा लागल,तळ्यात जसा मासा गळाला लागतो तसा कार्यकर्ता हातुन सुटायला नाही पाहिजे,यासाठी कुठलीही कसुर सुटलेली दिसत नाही.’अमुक तमुक मंडळात आपला संपर्क आहे का?
नसेल तर लावा’,पावती करु’ जमिनीच्या व्यवहारात जसे एजंट तसे कार्यकर्ते लावलेत.हे पगारी कार्यकर्ते प्रभागातील मंडळात भावींच्या आदेशाने भेटी घेत फिरताना दिसत आहेत.यात मंडळांची चांदी होत आहे.कोरानाच्या काळात जनतेला रस्त्यावर सोडलेल्यांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता जनतेने रस्त्यावर आणावेच.संकट समयी जो उभा राहतो तोच खरा लोकप्रतिनिधी.