• October 1, 2022
  • No Comment

मोक्कांतर्गत गुन्ह्यांमधील दोन वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

मोक्कांतर्गत गुन्ह्यांमधील दोन वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

मुळशी: पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेने मोक्कांतर्गत गुन्ह्यांमधील गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे.

जॅकी उर्फ स्वप्नील पडळघरे (वय 35 वर्षे, रा. पडळकरवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे), नवनाथ भोईने (वय 28 वर्षे, रा मोरेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडण्यासाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 29 सप्टेंबरला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व त्यांच्या पौड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 307, 147, 148, 149, 34 सह मोक्काच्या गुन्ह्यातील गेल्या दोन वर्षापासून परळी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले होते.

तसेच, या गुन्ह्यातील फरारी असलेले अजून दोन आरोपी हे परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून दहशतवाद विरोधी शाखा पथकाने सापळा रचून आरोपी जॅकी उर्फ स्वप्निल पडळघरे व नवनाथ भोईने रिहे परिसरातून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईकामी पौड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई कारवाई डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, भाऊसाहेब ढोले पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, ईश्वर जाधव, पोलीस हवालदार विशाल भोरडे मोसीन शेख या पथकाने केली. तसेच तांत्रिक मदत सायबर पोलीस ठाण्याचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली.

Related post

एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा

एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं…

सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीच्या घरात एलपीजी गॅसच्या न्यू कनेक्शनची नितांत गरज आहे. सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे म्हणजेच एलपीजी गॅस न्यू कनेक्शनमुळे एलपीजी…
पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? पहा जिल्हावार संपर्क यादी

पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? पहा जिल्हावार संपर्क…

शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जात…
EPFO (ईपीएफओ) च्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदाची बातमी, लाभ घेण्यासाठी करा हे काम, नाहीतर होईल मोठ नुकसान

EPFO (ईपीएफओ) च्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदाची बातमी, लाभ घेण्यासाठी…

ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *