• September 23, 2023
  • No Comment

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा तरुण गजाआड

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा तरुण गजाआड

    राजगुरुनगर : अवैधरित्या गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या खरपुडीतील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. दुर्गेश बाळासाहेब गाडे (वय २३ रा. खरपुडी खुर्द, ता. खेड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा ग्रामीण तपास पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून (दि. २१ )रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिरोली खरपुडी फाटा येथे दुर्गेश बाळासाहेब गाडे यांची झडती घेतली. त्यावेळी एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असे बेकायदेशीररित्या विनापरवाना मिळून आले.

    संबंधित आरोपीकडून पोलिस आणखी माहिती घेत असून तपास करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत. पिस्तूलाबाबत ज्या नागरिकांना माहिती असेल त्यांनी पोलिसांना ही माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांनी सांगितले

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *