• September 24, 2023
  • No Comment

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने  वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या

पिंपरी : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात आहे. तसेच गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने गणेशोत्सवादरम्यान विशेष मोहीम राबवली. वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या. हे तीनही गुंड तडीपारीच्या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत येऊन शस्त्र बाळगून होते. गुंडा विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांनी धसका घेतला आहे.
दीपक आबा दाखले (२५, रा. रहाटणी) याला ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले. तो परवानगीशिवाय शहरात आला. त्याच्याकडे शस्त्र आहे, अशी माहिती पोलिस अंमलदार रामदास मोहिते यांना मिळाली. त्यानुसार दाखले याला त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक सत्तूर मिळाला. याप्रकरणी त्याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दीपक दाखले याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत

अमित गजानन वानरे (३२, रा. आदर्श नगर, किवळे, देहूरोड) याला १२ जुलै २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार केले. तो देखील शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार शुभम कदम यांना माहिती मिळाली. पोलिसांनी अमित वानरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली. अमित वानरे याच्या विरोधात २०१५ पासून देहूरोड, खडकी, चिंचवड, तासगाव, चाकण, निगडी, पिंपरी, रावेत पोलिस ठाण्यात एकूण १२ गुन्ह्यांची नोंद आहे

मावळ परिसरातील सराईत गुन्हेगार समीर उर्फ सोन्या जालिंदर बोडके (२८, रा. गहुंजे गाव, ता. मावळ) यालाही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले. तो देखील बेकायदेशीरपणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार गणेश मेदगे यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत समीर बोडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सत्तूर हे शस्त्र जप्त केले. समीर याच्या विरोधात २०१४ पासून तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *