• September 24, 2023
  • No Comment

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा

    पुणे : कुंपणाच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह १५ जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अभिजीत बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री (रा. वानवडी गाव) यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
    वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन परिसरात महिलेची वडिलोपार्जित जागा आहे. फिर्यादी महिला वारस आहेत. त्यांनी भूमापन अधिकाऱ्याकडून सरकारी मोजणी केली होती. त्याठिकाणी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवरकर यांनी कामगारांना रोखले. लोखंडी खांब काढून टाकले. आम्ही जमीन मालक आहोत, असे सांगून शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यांना जागेच्या परिसरातून हाकलून लावले. पुन्हा या परिसरात दिसल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *