• September 24, 2023
  • No Comment

मुंढवा भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनीपकडले

मुंढवा भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनीपकडले

    पुणे : मुंढवा भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून ३१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. सतीश देवा हिरेकेरुर (वय ३६, रा. टाटा सोसायटी, विकासनगर, घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवात मुंढवा भागातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. गर्दीत नागरिकांचे मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे

    हिरेकेरुर याने नागरिकांची मोबाइल संच चोरल्याची माहिती तपास पथकातील कर्मचारी दिनेश भांदुर्गे, महेश पाठक यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ३१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर आदींनी ही कारवाई केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *