- February 26, 2024
- No Comment
बहिणीच्या मित्राने केला झोपलेल्या तरुणीवर शारीरीक अत्याचार
पुणे : बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरुन झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने शारीरीक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६८/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विश्वास पारडे (वय २९, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चार वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र असल्याने त्यांच्यात ओळख होती. त्यामुळे तो फिर्यादीच्या घरी येजा करीत असे. फिर्यादी या घरात झोपल्या असताना त्याने फिर्यादीचे तोंड दाबून शांत बस असे धमकाविले. त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्याच्या मित्राला फिर्यादी यांनी हा प्रकार सांगितला. त्याचा राग मनात धरुन विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करीत आहेत.