• December 22, 2024
  • No Comment

धनकवडीतील मुलगी पोहचली आळंदीत ! तब्बल 12 तासांच्या शोधानंतर सापडली

धनकवडीतील मुलगी पोहचली आळंदीत ! तब्बल 12 तासांच्या शोधानंतर सापडली

     

    पुणे: घरी झालेल्या किरकोळ वादानंतर एक १० वर्षाची मुलगी रागावून घरातून निघून गेली होती. तब्बल १२ तास शोध घेतल्यानंतर ही मुलगी मध्यरात्री दीड वाजता आळंदी येथे सापडली.

    भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने या मुलीचा शोध घेतला.

    भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth) येथील थोरवे शाळेमधून ही मुलगी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली. पण, ती घरी पोहचलीच नाही. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी शाळेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा ती शाळेतून बाहेर पडलेली दिसली. त्यानंतर ती एका बसस्टॉपवर दिसली. याबाबत पोलिसांनी तिच्या वडिलांना विचारल्यावर त्यांनी या बसस्टॉपवरुन आम्ही स्वारगेटला जातो व तेथून बसने आळंदीला नेहमी जातो. तिचे वडिल हे आळंदीमधील एका मठात नेहमी जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ही मुलगीही त्यांच्याबरोबर असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी स्वारगेट येथील सीसीटीव्ही तपासले व तेव्हा आळंदीला जाणार्‍या बसस्टॉपवर ही मुलगी दिसून आली. त्यानंतर पोलीस पथक आळंदीत पोहचले. त्यांनी आळंदीमध्ये या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा ती मुलगी सापडली.

    याबाबत पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी सांगितले की, या मुलीच्या वडिलांनी आम्ही नेहमी आळंदीतील मठात जातो, याची माहिती दिली. मुलीला तेथे जाण्यासाठीच्या बसची माहिती होती. तसेच आळंदीमध्ये अनेक ठिकाणी भोजनाची सोय असल्याचे या मुलीला माहिती असल्याने ती तिकडेच गेली असेल, हे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. आळंदीमध्ये शोध घेतला असता मध्यरात्री दीड वाजता ही मुलगी मिळाली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *