- December 22, 2024
- No Comment
यामुळे खराब करू शकतात तुमचा सिबिल स्कोअर, कर्ज घेताना होऊ शकते अडचण
कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यानंतर बँका सरसकट ते देत नाहीत. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याचे अनेक निकष असतात. त्यात सिबिल स्कोअर हा एक महत्त्वाचा निकष असतो.
हा ३ अंकी आकडा तुमची पात्रता सांगतो. कर्जाच्या अटी निश्चित करण्यासाठी बँका सिबिल स्कोअर तपासतात. तो समाधानकारक असेल तरच कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करतात.
चांगला सिबिल स्कोअर आपल्याला कमी व्याजदरानं कर्ज मिळविण्यात मदत करतो. बँकबझारच्या मते, ७५० ते ९०० च्या दरम्यानचा सिबिल स्कोअर चांगला मानला जातो. सिबिल स्कोअर कमी असल्यास बँक कर्ज नामंजूर करते किंवा अधिक कठोर अटी घालून कर्ज मंजूर केलं जातं.हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्या कोणत्या पाहूया
पेमेंट हिस्ट्री
तुमच्या सिबिल स्कोअरवर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा सर्वात मोठा परिणाम होतो. क्रेडिट हिस्ट्री हा कर्ज आणि परतफेडीच्या व्यवहारांचा सारांश असतो. तुम्ही तुमची थकबाकी वेळेवर भरत आहात की नाही ते यावरून कळतं. आपण पेमेंट चुकवल्यास त्याचा आपल्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. वेळेवर पैसे भरले जावेत किंवा नियोजित तारखा चुकू नयेत म्हणून रिमाइंडर लावून ठेवा.
क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो
हा रेश्यो बँकेनं दिलेल्या क्रेडिट मर्यादेच्या संदर्भात वापरलेली क्रेडिट रक्कम दर्शवते. कमी क्रेडिट युटिलायझेशन रेशो असणं म्हणजे आपल्या एकूण उपलब्ध क्रेडिटचा एक छोटासा भाग वापरला जाणं. अशावेळी बँकांना वाटतं की, तुम्ही तुमची पत व्यवस्थित सांभाळत आहात. तथापि, अधिकाधिक क्रेडिट वापर गुणोत्तर कर्जावरील अधिक अवलंबित्व अधोरेखित करतो. सिबिल स्कोअर मोजण्यासाठी हे गुणोत्तर एक महत्त्वाचा घटक आहे.