• December 22, 2024
  • No Comment

लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण

लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण

    पिंपरी :सातत्याने कारवाई करूनही कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच असून आता कोयत्याची जागा हातोडीने घेतली आहे. शिक्षिका लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये आलेल्या एकाने तिच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी करत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली.

    जखमी शिक्षिकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका या खासगी शिकवणी घेतात. तसेच घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कामही करतात. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी शिक्षिका या नेहमीप्रमाणे पांलाडे निवास येथील एका कुटुंबातील मुलाला शिकवण्यासाठी चालल्या होत्या.

    इमारतीच्या वाहनतळामधील लिफ्टमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची आई आणि फिर्यादी शिक्षिका गेल्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून आरोपी अचानक लिफ्टमध्ये आला. त्याने शिक्षिकेच्या डोक्यात, पाठीत आणि खांद्यावर हातोडीने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली आणि पसार झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याआधारे पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कलगुटके करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *