- December 22, 2024
- No Comment
नऊ लाख रुपयांचा गुटखा जप्त, स्वारगेट पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे: गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. पोलिसांनी टेम्पोतून आठ लाख ५८ हजारांचा गुटखा, तसेच टेम्पो असा १८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सौरभ उर्फ धनराज निंबाळकर ( २४, रा.थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम निंबाळकर ( २६) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भापकर यांना मिळाली. पथकाने सापळा लावून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी करण्यात आली, तेव्हा टेम्पोत गुटख्याचा साठा आढळला. अटक करण्यात आलेले दोघे जण भाऊ असून त्यापैकी एकाविरुद्ध यापूर्वी गु्न्हे दाखल झाले आहेत.
दोघांनी गुटखा कोठून आणला, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.