• December 22, 2024
  • No Comment

घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वृद्ध जखमी, पिंपरी – संत तुकाराम नगरमधील घटना

घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वृद्ध जखमी, पिंपरी – संत तुकाराम नगरमधील घटना

पिंपरी: चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचा स्पोर्ट होऊन ७० वर्षीय वृद्ध जखमी झाला. तसेच खोलीच्या छताचे पत्रे उडून घरगुती साहित्याचे नुकसान झाले. पिंपरी येथील संत तुकाराम नगरमध्ये शनिवारी (दि.२१) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ‌

चंद्रकांत शिवलिंग कांबळे (७०, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत कांबळे यांचे एक नातेवाईक संत तुकाराम नगर येथे राहण्यास आहेत. या नातेवाईकाच्या घराच्या टेरेसवरील एका खोलीत कांबळे आणि त्यांचा भाऊ राहतात. कांबळे यांचा भाऊ शनिवारी सायंकाळी बाहेर गेले असता कांबळे खोलीत एकटे होते. त्यावेळी चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात चंद्रकांत कांबळे हे जखमी झाले. तसेच स्फोटामुळे आग लागून खोलीच्या छताचे पत्रे आणि खोलीतील घरगुती साहित्य जळून नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोट झालेल्या छोट्या सिलेंडरसह एक घरगुती वापराचा गॅस सिलेंडर जळालेल्या अवस्थेत जवानांनी बाहेर काढला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने घरातील तीन सिलेंडर बाहेर काढण्यात आले. जखमी कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोट किंवा आगीचे अद्याप समजू शकले नाही.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *