• December 22, 2024
  • No Comment

लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा, घरबसल्या असं तपासा स्टेटस

लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा, घरबसल्या असं तपासा स्टेटस

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

    लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे देण्यात आले होते. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता निवडणुका पार पडल्यानंतर सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे बँकेत जमा होण्याची वाट महिला पाहत आहेत.

    डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी बँकेत जमा होणार…

    हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 19 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही.

    राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

    हे पण वाचा : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच केली जाहीर

    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. 21 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशन संपले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल असं बोललं जात आहे.

    लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर होती. या तारखेपर्यंत प्रशासनाकडे लाखोंच्या संख्येत अर्ज दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीची आाचारसंहिता लागल्याने या पैकी अनेक अर्जांची छाननी झाली नव्हती. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली. या योजनेसाठी तुम्ही दिलेल्या बँक खात्याचा तपशिल दिलेला असेल पण हे बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत जोडलेले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यासोबत आधारकार्ड जोडणे अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *