• December 23, 2024
  • No Comment

भीमथडी जत्रेत स्टॉलवरील रोकड चोरणारे सीसीटीव्हीत कैद ! शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना केली अटक

भीमथडी जत्रेत स्टॉलवरील रोकड चोरणारे सीसीटीव्हीत कैद ! शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना केली अटक

पुणे: भीमथडी जत्रेत स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड, पेनड्राइव्ह चोरुन नेला. ही चोरी तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी चौघा चोरट्यांना अटक केली आहे.

मनोज भगतसिंग पवार (वय ४१), संदीप संजय गौड (वय ३२), रतिलाल प्रेमलाल परमार (वय ५५), विकी राजू साळुंखे (वय ३५,सर्व रा. येडा चौक, जामखेड, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत भाग्यश्री मंदार जाधव (वय २८, रा. आझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंचननगर येथील भीमथडी जत्रेत रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भीमथडी जत्रेत महिला बचत गटाचा स्टॉल आहे. स्टॉलवर कुरडया, पापड, लोणची यांची विक्री करण्यात येत आहे. रविवारी जत्रेत खूप गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी आतल्या बाजूला ठेवलेल्या बॉक्समधून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्टॉलवरील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा रोकड चोरताना चोरटे त्यात कैद झाले होते. त्यावरुन त्यांनी भीमथडी जत्रेतील असणार्‍या या चोरट्यांना पकडले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यात चोरटे दिसून आले. त्यावरुन शोध घेऊन चोरट्यांना पकडले. भीमथडी जत्रेत शुक्रवारी एका महिलेच्या स्टॉलमधून ७० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या महिलेचा कपड्यांचा स्टॉल आहे. त्या ग्राहकांना कपडे दाखवत होत्या. त्यावेळी हँगरला लावून ठेवलेल्या कपड्यांच मागे कोपर्‍यामध्ये ठेवलेली यांची पर्स चोरट्यांनी लांबविली. त्या पर्समध्ये ७० हजार ५५० रुपये रोख व पेनड्राइव्ह होता.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करीत आहेत.

Related post

रेशन कार्डचे नियम बदलले, फक्त याच लोकांना मिळणार मोफत रेशन

रेशन कार्डचे नियम बदलले, फक्त याच लोकांना मिळणार मोफत…

रेशन कार्डचे नियम बदलले आहेत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. ज्यांनी E KYC केलं नाही त्यांचं…
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात 2 लाखांपर्यंत मिळणार विनातारण कर्ज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात 2 लाखांपर्यंत मिळणार विनातारण…

भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे. यापूर्वी…
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी असून उद्या दि. २४ डिसेंबर २०२४ पासून जुन्या टर्मिनलवरुन होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलवरुन होणार आहेत. केंद्रीय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *