- December 23, 2024
- No Comment
पुण्यात जन्या वादातून तरुणावर हल्ला; कुर्हाड अन् कोयत्याने सपासप वार
पुणे: वारजे परिसरात जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने कोयते तसेच कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत देखील माजवली.
दोन दिवसांपुर्वी रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भैय्या उर्फ लक्ष्मण शेडगे याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत जुबेर शेख (वय २२) याने तक्रार दिली आहे. हल्यात अक्षय कांबळे (वय २८) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुासर, जुबेर व अक्षय मित्र असून, ते आणि काही मित्र रात्री म्हाडा वसाहतीसमोर शेकोटी करून बसलेले होते. दरम्यान, यातील आरोपी व तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अक्षय कांबळे व आरोपींमध्ये जुने वाद होते. वादानंतर आरोपींच्या मनात राग होता. तक्रारदार व अक्षय शेकोटी करून तापत बसले असताना टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी कोयते व कुर्हाडीने अक्षय याच्यावर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करत तेथे गोंधळ घालत आरोपी पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.