दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरु, थेट सरकार कडून मुभा

दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरु, थेट सरकार कडून मुभा

पुणे: नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे

अनेकजण मद्य पिऊन नव वर्षाचे स्वागत करत असतात. या काळात सर्वाधिक मद्यविक्री होते. २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बीअर/ वाइन विकणाऱ्या दुकानांना सकाळी 1 वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. FLBR-II परवानाधारकांसाठीही अशीच मुदतवाढ देण्यात आली.

नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. याच मद्यप्रेमींना सरकारकडून चिअर्स करण्यात आलेय. ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी करण्यात आलेत.

गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

२१ डिसेंबर रोजी गृह विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलेय. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील. तर परमीट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. रात्री साडेदहा वाजता राज्यभरात दारूची दुकाने बंद होतात. पण ख्रिसमस आणि वर्षाअखेरीस मद्यविक्रीची वेळ वाढवण्यात आली आहे.

पोलिसांकडून कडक बंदोबस्त

24, 25 डिसेंबर आणि थर्टी फस्ट हे तीन दिवस सर्वजण सेलिब्रेशन करतात. पण या काळात बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवल्याने पोलिसांची कसरत होणार आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहे. तसेच अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके तैणात होतील. रात्रीच्या गस्त, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी पोलिसांकडून होईल.

Related post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी असून उद्या दि. २४ डिसेंबर २०२४ पासून जुन्या टर्मिनलवरुन होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलवरुन होणार आहेत. केंद्रीय…
सॅलिसबरी पार्कमधील फ्लॅटमधून ५० तोळ्यांचे दागिने लंपास

सॅलिसबरी पार्कमधील फ्लॅटमधून ५० तोळ्यांचे दागिने लंपास

पुणे: सॅलिसबरी पार्क परिसरातील फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील ५० तोळ्यांचे सोन्याचे व हिरेजडीत दागिने तसेच चांदीची लगड असा…
मृत व जखमींच्या नातेवाईकांचे पुणे-नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन; मृतांना २५ लाख रुपये देण्याची व पुनर्वसन करण्याची मागणी

मृत व जखमींच्या नातेवाईकांचे पुणे-नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन; मृतांना…

वाघोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणावी. मृतांना २५ लाखांची मदत द्यावी या मागणीसाठी मृत व जखमीचे नातेवाईक व अपघात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *