मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला नेले फरफटत, हडपसर परिसरातील घटना

मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला नेले फरफटत, हडपसर परिसरातील घटना

हडपसर: पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाइल, घरफोडी, बस मध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच आता हडपसर परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तरुणाने चोरट्यांना विरोध केला असता दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेले.

तसेच दुचाकीस्वार चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने तरुणाच्या हाताचा चावा घेऊन मोबाइल चोरुन चोरटे पसार झाल्यची घटना घडली आहे. ही घटना हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरात राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पादचारी तरुण भगीरथीनगर परिसरातून जात होता. सोसायटीकडे वळत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तरुणाने त्यांना विरोध केला, तसेच चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने तरुणाला २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढचं नाही तर दुचाकीस्वार चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने तरुणाच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या झटापटीत तरुणाच्या गुडघ्याला दुखापत झाली.

दरम्यान, तरुणाकडील मोबाइल संच चोरुन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे करत आहेत.

Related post

रेशन कार्डचे नियम बदलले, फक्त याच लोकांना मिळणार मोफत रेशन

रेशन कार्डचे नियम बदलले, फक्त याच लोकांना मिळणार मोफत…

रेशन कार्डचे नियम बदलले आहेत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. ज्यांनी E KYC केलं नाही त्यांचं…
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात 2 लाखांपर्यंत मिळणार विनातारण कर्ज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात 2 लाखांपर्यंत मिळणार विनातारण…

भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे. यापूर्वी…
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी असून उद्या दि. २४ डिसेंबर २०२४ पासून जुन्या टर्मिनलवरुन होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलवरुन होणार आहेत. केंद्रीय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *