• December 23, 2024
  • No Comment

पत्नीला दगडाने मारहाण करणार्‍या पतीला मनमाडमधून केले गजाआड,गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पत्नीला दगडाने मारहाण करणार्‍या पतीला मनमाडमधून केले गजाआड,गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

    दारुच्या नशेत पत्नीला दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी करुन पळून गेलेल्या पतीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने मनमाड येथून ताब्यात घेतले.

    कैलास गणपत जाधव (वय ४४, रा. केसनंद फाटा, वाघोली) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याचा जावई विनायक जोगदंड (वय ३१, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार संत तुकारामनगर येथील ओंकार बिल्डिंगमध्ये रविवारी पहाटे ४ वाजता घडला होता.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास जाधव याने दारुच्या नशेत किरकोळ घरगुती कारणावरुन आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. तसेच त्याने फिर्यादी यांची मेव्हणी व त्याची मुलगी गायत्री कैलास जाधव (वय १६) हिला ही मारहाण करुन जखमी केले़ त्यानंतर तो पळून गेला होता.

    गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व त्यांचे पथकाला कैलास जाधव हा मनमाड रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अंमलदार कारखेले, तनपुरे व डोंगरे हे तातडीने मनमाडकडे रवाना झाले. मनमाड पोलिसांशी संपर्क साधून कैलास जाधव याला मनमाड रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला वाघोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    सदरची उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश् मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *