- December 23, 2024
- No Comment
मृत व जखमींच्या नातेवाईकांचे पुणे-नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन; मृतांना २५ लाख रुपये देण्याची व पुनर्वसन करण्याची मागणी
वाघोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणावी. मृतांना २५ लाखांची मदत द्यावी या मागणीसाठी मृत व जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे नगर महामार्गावर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको केला.
पोलिसांनी त्यांची समजूत काढून बाजूला घेतले. यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.
यानंतर त्यांनी आम्ही येथेच थांबतो. जो पर्यंत मुख्यमंत्री भेट देत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. आमची खूपच हेळसांड होत आहे. सरकार आमच्या कडे लक्ष देत नाही. या सर्व मजुरांचे पुनर्वसन करावे. अशीही मागणी ते करत होते.
परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी पोलीस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मतीन भोसले, नामदेव भोसले, राजश्री काळे यांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा भेट घडवून आणून देवू असे आश्वासन पोलिसांनी त्यांना दिले.