• December 24, 2024
  • No Comment

आता अ‍ॅपवरूनच मिळणार तुम्हाला स्वस्त धान्य; असे वापरा अ‍ॅप

आता अ‍ॅपवरूनच मिळणार तुम्हाला स्वस्त धान्य; असे वापरा अ‍ॅप

शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता नागरिकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही.

डिजिटल पद्धतीने रेशन कार्डशिवाय नागरिकांना रेशन मिळणार आहे.

सरकारने रेशन मिळवण्यासाठी अ‍ॅप लाँच केले आहे. ‘मेरा राशन २.०’ हे अ‍ॅप वापरून आपण रेशन मिळवू शकणार आहे. म्हणजेच आता नागरिकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका अ‍ॅपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल. केंद्र सरकार दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते.

आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन २.० अ‍ॅपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे. भारत सरकारच्या या अ‍ॅपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरत राहतात. या अ‍ॅपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचे रेशन सहज मिळू शकेल.

रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेकवेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फे-या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता.

मेरा राशन अ‍ॅप २.० कसे वापरावे?
– गुगुल प्ले स्टोअर्स अ‍ॅप किंवा अ‍ॅपल स्टोअर्सवरून मेरा राशन २.० अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
– मेरा राशन २.० अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
– ओटीपी पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी भरा.
– या स्टेप्सनंतर तुमच्या रेशनकार्डची डिजिटल कॉपी ओपन होईल. ही प्रत दाखवून तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल.

लागणारी कागदपत्रे:
नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.

 

Related post

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून  अटक

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गाजा हस्तगत केला…
पुणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या सात पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती

पुणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या…

पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना…
विम्याच्या नावाखाली तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक

विम्याच्या नावाखाली तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : क्रेडीट कार्डवरील विमा नको असल्यास प्रोसेस करून ओटीपी नंबर सांगण्यास भाग पाडून त्याद्वारे एका तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *