• December 24, 2024
  • No Comment

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी, आजपासून १५०० रूपये खात्यात जमा होणार

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी, आजपासून १५०० रूपये खात्यात जमा होणार

    लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता.

    तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

    लाडकी बहीण योजनेत ३५ लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे.

    लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते.त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत सहावा हप्ता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.

    महिला व बालविकास खात्याचं वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते देण्यात आले आहे. खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महिलांना पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे.

    २१०० रुपये कधीपासून?

    लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. या योजनेत महिलांना लवकरच २१०० रुपये दिले जाणार आहे. मात्र, हे पैसे कधीपासून दिले जाणार आहेत, याची तारीख समोर आलेली नाही. दरम्यान, महिलांनो, मार्चपर्यंत थांबा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तुम्हाला २१०० रुपये दिले जातील, असं आदिती तटकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे मार्चनंतर तुम्हाला २१०० रुपये मिळणार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *