• December 24, 2024
  • No Comment

कोणत्याही हमीशिवाय ८०,००० रुपयांचे कर्ज, पी एस स्वनिधी योजनेसाठी असा करा अर्ज!

कोणत्याही हमीशिवाय ८०,००० रुपयांचे कर्ज, पी एस स्वनिधी योजनेसाठी असा करा अर्ज!

    अनेकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो. व्यवसाय सुरु करायचा म्हटल्यावर भांडवल हे लागते.जर तुम्हाला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचे असेल तर तुम्हाल स्वनिधी योजनेतून कर्ज मिळवू शकतात.

    या योजनेत तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज मिळणार आहे.

    स्वनिधी योजनेत तु्म्हाला ८० हजारांपर्यंत कर्ज मिळू शकतात. तीन हप्त्यांमध्ये तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर तुम्हाला कमीत कमी व्याजदर द्यावे लागणार आहे.स्वनिधी योजनेअंतर्गत स्ट्रीट स्टॉल म्हणजे फळविक्रेते, भाजीविक्रेते यांना कर्ज मिळणार आहे.

    लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली आहे. लघुउद्योगांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरु केली होती

    या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यावर लगेचच तुम्हाला १०,००० रुपये मिळणार आहेत. तर या रक्कमेची परतफेड केल्यावर तुम्हाला २०,००० रुपये मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही २०,००० रुपयांची परतफेड केली तर तुम्हाला ५०,००० रुपये मिळणार आहे.या योजनेत तुम्हाला ८०,००० रुपयांची मदत मिळणार आहे.

    पीएम स्वनिधी योजनेत ७ टक्के व्याजदर आकारले जाते. याशिवाय डिजिटल व्यव्हार केल्यावर तुम्हाला वार्षिक १२०० रुपयांचा कॅश बॅक दिला जाईल. या योजनेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

    पीएम स्वनिधी योजनेत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हमीची गरज नसते. या योजनेत घेतलेली रक्कम तुम्ही १ वर्षाच्या आत तुम्हाला परत करायची असते. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *