• December 24, 2024
  • No Comment

पुणे सोलापूर महामार्गावर कंटेनरला आग, एकाचा मुत्यु

पुणे सोलापूर महामार्गावर कंटेनरला आग, एकाचा मुत्यु

पुणे: पुणे सोलापूर महामार्गावर यवत गावाच्या हद्दीत मंगळवारी पहाटे 4 वाजणाच्या सुमारास एसीचे साहित्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. यात कंटेनर मधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवत गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर चेन्नई वरून भिवंडी कडे एसीचे साहित्य घेऊन जाणारा कंटेनरला पहाटे चारच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी कंटेनर चालकाने गाडीमधून उडी मारून आपला जीव वाचवला तर क्लिनर प्रिंन्स राजा परमल राहणार ललीतपुर उत्तर प्रदेश याचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच श्री दत्त ट्रान्सपोर्टचे संचालक संदीप दोरगे यांनी अग्निशामक विभागाला कळवून रुग्णवाहिका बोलून घेतली होती, तसेच यवत गावातील आबा दोरगे, अमर चोरगे, विक्रांत दोरगे, धीरज सोनवणे, समीर अन्सारी यांनी घटनास्थळी मदत कार्य केले.

यवत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सचिन काळे झेंडे आणि कापरे यांनी मदतकार्य सुरू केले होते. परंतु एसी साहित्यात गॅस असल्याने छोटे छोटे स्पोर्ट होऊन आग आटोक्यात येत नव्हती सुमारे तीन तासाच्या प्रयत्नानंतर या आटोक्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related post

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्ण काळाचा पाया रचणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्ण काळाचा पाया रचणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,…

त्यांच्या २००४-१४ या काळात देशाची अर्थव्यवस्था जगातील ३ री मोठी अर्थव्यवस्था झाली होती.   २००८ साली जागतिक मंदीतून विश्व बाहेर आले…
आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? मग हे बघाच!

आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? मग…

आधार कार्ड भारतीयांची ओळख आहे. भारतात सगळीकडे आपल्याला आधार कार्डची गरज असते. तर आधार कार्ड आज सगळीकडे व्हॅलिड आहे. म्हणजेच तुम्ही…
पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन; लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन;…

लोणावळा: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. सचिन सस्ते असं त्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *