• December 24, 2024
  • No Comment

पुणे स्टेशन येथे उपाहारगृहातील कामगाराला कोयत्याने भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोन आरोपी गजाआड

पुणे स्टेशन येथे उपाहारगृहातील कामगाराला कोयत्याने भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोन आरोपी गजाआड

    पुणे: पुणे स्टेशन परिसरात उपहारगृहातील कामगाराला भोसकून त्याच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक करण्यात आली.

    गौरव भारत धोकडे (वय १९), आकाश बाळू कांबळे (वय १९, दोघे रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा, मूळ रा. आर्णे, जि. यवतमाळ) जखमी झाले असून आडे क्वीन्स गार्डनमधील एका क्लबच्या आवारातील उपाहारगृहात वेटर आहेत. सोमवारी मध्यरात्री ते काम संपवून घरी निघाले होते. स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृहाजवळ ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपी धोकडे आणि कांबळे दुचाकीवरुन आले. त्यांनी आडे यांच्याकडे ५०० रुपये मागितले. आडे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता काढून पोटाला लावला.

    आडे यांना कोयत्याने भोसकून आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील आडे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *