- December 24, 2024
- No Comment
सलग दुसऱ्या दिवशी डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं,वाघोलीत अपघात सत्र सुरूच
पुणे: पुण्यातील वाघोलीमध्ये रविवारी मध्यरात्री भरधाव डंपरने ९ जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच वाघोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा डंपरने एका तरुणाला उडवलं.
या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झाला आहे. डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार साईराज देशमुख हा गंभीर जखमी झाला आहे. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर या ठिकाणी हा अपघात झाला. रविवारी वाघोलीत केसनंद फाट्यावर एका डंपरने ९ जणांना चिरडले होते. या घटनेनंतर वाघोली परिसरामध्येच हा दुसरा अपघात झाला आहे. वाघोली पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.