• December 24, 2024
  • No Comment

पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला जेरबंद; पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकानची कामगिरी

पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला जेरबंद; पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकानची कामगिरी

    पिंपरी: पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने बांगलादेशी पती-पत्नीला पिंपरी-चिंचवडमधून अटक केली आहे. दोघेही गेल्या आठ दिवसांपासून आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलमध्ये कामगार बनून काम करत होते.

    टिंकू चौधरी आणि खादिजा खातून अशी दोघांची नाव आहेत. दोघांकडे बनावट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र आढळले आहे. दोघांना चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

    पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. याच औद्योगिक नगरीत गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी नागरिक बेकायदा राहत असल्याचं वारंवार उघड झालेल आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द असलेल्या आळंदी फाटा येथे हॉटेलमध्ये कामगार बनून बांगलादेशी टिंकू चौधरी आणि खादिजा खातून वास्तव्य करत होते. ते गेल्या आठ दिवसांपूर्वीच त्या हॉटेलमध्ये आले होते. त्याआधी ते हैदराबादमध्ये एक ते दोन वर्षांपासून राहत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दोघांकडे वोटर आयडी आणि आधार कार्ड आढळल आहे. पोलिसांच्या तपासात ते बनावट असल्याचे उघड झाल आहे.

    आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलवर दोन बांगलादेशी पती-पत्नी वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी खात्री करून दोघांकडे चौकशी केली. चौकशीमध्ये ते बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या भारतीय प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असल्याने चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५), सह परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४ (A)(B), १४ (C) पार पत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१)(सी) व पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३(अ) या कलमानव्ये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *