• December 25, 2024
  • No Comment

लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या करा चेक

लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या करा चेक

    लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जूनमध्ये याबाबत घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत सहा हप्ते सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. येत्या काळात लाभार्थी महिलांना 2100 रुपयांचा लाभ मिळेल असं आश्वासनही दिलं आहे मात्र त्यासाठी बजेटपर्यंत वाट पाहावी लागू शकते.

    मुख्यमंत्री फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठी अपडेट दिली आहे. 24 डिसेंबरपासून खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

    लाडकी बहीण योजनेचे पैसे मंगळवार 24 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यावर सहावा हप्ता जमा होणार आहे. काही महिलांच्या खात्यावर हे पैसे यायला विलंब झाला असू शकतो. तर काही महिलांना पैसे मिळालेले असू शकतात. तुम्हाला खात्यावर पैसे जमा झाले की SMS येईल. जर आला नाही तर तुम्ही स्टेटस कसं चेक करायचं ते सांगणार आहोत.

    1. तुमच्या अर्जाची स्थिती तपासा
    सर्वप्रथम, तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही याचं स्टेटस तपासा. यासाठी तुम्हाला नारी शक्ती अॅपवर लॉगइन करावं लागेल. तो पर्याय नसेल तर तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही लॉगइन करून स्टेटस चेक करू शकता.

    मोबाइल नंबर आणि अर्ज क्रमांकाचा वापर करून लॉगिन करा.
    संबंधित विभागात अर्जाची स्थिती तपासा. जर अर्ज Under Review असे दाखवत असेल, तर तो प्रक्रियेत आहे. पण जर अर्ज Approved झाला असेल आणि तरीही पैसे आले नसतील, तुम्ही या गोष्टी न चुकता करायला हव्यात.

    2. बँक तपशील तपासा
    बँक खात्याशी संबंधित तपशील चुकीचे असल्यास पैसे मिळण्यात विलंब होऊ शकतो. नोंदणीकृत खाते क्रमांक, IFSC कोड आणि खातेधारकाचे नाव तपासा. या तपशीलात त्रुटी असल्यास, योजनेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून किंवा स्थानिक सरकारी कार्यालयात भेट देऊन तपशील दुरुस्त करा.

    3. योजनेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधा
    लाडकी बहिण योजनेसाठी एक विशेष हेल्पलाइन उपलब्ध आहे. अर्ज स्थिती व पैसे मिळण्याविषयी अधिक माहितीसाठी हेल्पलाइनवर कॉल करा किंवा ईमेल पाठवा. तुमचा अर्ज क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर जवळ ठेवा.

    4. स्थानिक सरकारी कार्यालयात भेट द्या
    जर ऑनलाइन पर्यायाने समस्येचे निराकरण झाले नाही, तर योजनेचे काम पाहणाऱ्या नजीकच्या सरकारी कार्यालयात भेट द्या. अर्ज क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रियेला गती द्या.

    5. पात्रतेच्या अटींचे पालन असल्याची खात्री करा
    कधी कधी पात्रतेच्या अटी पूर्ण न झाल्यास पैसे अडवले जातात. तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत आणि योजनेच्या निकषांशी जुळतात याची खात्री करा.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *