• December 25, 2024
  • No Comment

पिंपरी : ‘बीआरटी’त घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई; ‘इतक्या’ कोटींचा दंड केला वसूल

पिंपरी : ‘बीआरटी’त घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई; ‘इतक्या’ कोटींचा दंड केला वसूल

पिंपरी: शहरात गेल्या ११ महिन्यांत बीआरटी मार्गामध्ये घुसखोरी करणाऱ्या ३९ हजार ५०७ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या वाहनचालकांकडून तीन कोटी ७१ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरात जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी मार्गाची आखणी करण्यात आली. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी खासगी वाहनचालकांकडून मागील काही काळापासून बीआरटी मार्गात सर्रास घुसखोरी सुरू आहे.

बीआरटी मार्ग रिकामा असल्याने आणि वाहनचालक भरधाव असल्याने अनेक अपघात घडले आहेत. त्यातच मागील दोन वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) बीआरटी मार्गातील वॉर्डन हटविले आहेत. त्यामुळे वाहनचालक बीआरटी मार्गात प्रवेश करत आहेत. आगामी काळातही बीआरटीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिला आहे.

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांकडून ‘नो एण्ट्री’साठी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय वाहन परवाना नसणे, मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, आवश्यक कागदपत्रे न बाळगणे आणि जुनी दंडवसुलीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related post

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्ण काळाचा पाया रचणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्ण काळाचा पाया रचणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,…

त्यांच्या २००४-१४ या काळात देशाची अर्थव्यवस्था जगातील ३ री मोठी अर्थव्यवस्था झाली होती.   २००८ साली जागतिक मंदीतून विश्व बाहेर आले…
आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? मग हे बघाच!

आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? मग…

आधार कार्ड भारतीयांची ओळख आहे. भारतात सगळीकडे आपल्याला आधार कार्डची गरज असते. तर आधार कार्ड आज सगळीकडे व्हॅलिड आहे. म्हणजेच तुम्ही…
पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन; लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन;…

लोणावळा: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. सचिन सस्ते असं त्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *