धक्कादायक! प्रेयसीच्या मुलाला निर्दयीपणे संपवलं, भयंकर कारण समोर
- क्राईम
- December 25, 2024
- No Comment
पुणे: बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि प्रेयसीच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत प्रेमीने प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचे १५ दिवसानंतर उघड झाले आहे.
निरगुडसर (ता.आंबेगाव) येथून १२ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करुन हत्या करण्याची धक्कादायक घटना (ता.११) ते (ता.२४) डिसेंबर २०२४ रोजी या दरम्यान घडली आहे. २४ डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाणचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आला आहे. आरोपी राजेश जंबुकरनेही राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश रोहिदास जंबुकरने बुधवार ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. परंतु आरोपी राजेंद्र जंबुकर हा कुठेही मिळून आला नाही.
मात्र (ता.२४) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जंबुकरने राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता. पारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला. पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये विद्यार्थी आर्यन चव्हाण आणि आरोपी राजेश जंबुकर हा एका हॉटेलमध्ये ११ डिसेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास नाष्टा करत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात वेगाने तपास सुरू केला. आरोपी राजेश जंबुकर याला वायफाय देणारे मदत करणारे यांना खाकी दाखवली. घटनेतील काही बारकावे आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला. आर्यन चव्हाणचे अपहरण करणाऱ्या आरोपीनीचे आर्यनचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राजेश जंबुकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.