• December 26, 2024
  • No Comment

दंडात्मक कारवाईला येणार वेग; क्षेत्रीय कार्यालयांत भरारी पथक सज्ज

दंडात्मक कारवाईला येणार वेग; क्षेत्रीय कार्यालयांत भरारी पथक सज्ज

    पुणे: नागरिकांना स्वच्छतेची शिस्त लागावी, यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाईचा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयात भरारी पथक नेमले आहेत.

    या भरारी पथकाला वेगाने कारवाई करता यावी यासाठी यापूर्वी आठ चार चाकी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्यात वाढ करून आणखी १० चार चाकी देण्यात आल्या असून कारवाईला वेग येणार आहे.

    शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून राडारोडा टाकणे, प्लास्टिकचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे असे प्रकार केले जात आहेत. त्यावर महापालिकेकडून अनेक वेळा आवाहन करूनदेखील नागरिकांनी नियमांचे उल्लघंन केले जात आहे.

    पुणे महापालिका, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दंडात्मक कारवाईकरीता बोलेरो गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात १५ क्षेत्रीय कार्यालये व केंद्रीय प्लास्टिक पथक यांचेमार्फत दैनंदिन स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, बंदी असलेल्या आदी विविध प्रकरच्या बाबींकरिता दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. या कारवाईकरिता ३१ जानेवारी २०२४ रोजी एकूण ४ चार चाकी गाड्या आणि १८ जुलै २०२४ रोजी ४ अशा एकूण आठ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.

    त्यानंतर मंगळवारी (दि. २४) एकूण १० बोलेरो व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या असून १५ क्षेत्रीय कार्यालयांतील केंद्रीय प्लास्टिक पथकाकरिता प्रत्येकी एक, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागांतर्गत अभियांत्रिकी वर्गाकरिता एक आणि सॅनिटेशन विभागाकरिता एक अशा एकूण १८ चार चाकी वाहनांचे वाटप करण्यात आले आहे.

    नव्याने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचा उद्घाटन समारंभ आज महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम, उपायुक्त राजू नंदकर आदी उपस्थित होते.

    चार कोटींचा दंड घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत २ ऑक्टोबर २०२३ पासून आजपर्यंत एकूण ७२,७७८ जणांवर दंडात्मक कारवाई करून ४ कोटी ३ लाख ७१ हजार ९२१ रुपये इतका दंड व एकूण ६२६८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *