- December 26, 2024
- No Comment
२ तरुणी पकडल्या.. पीएमपीबस मध्ये करत चोऱ्या-६ तोळे दागिने हस्तगत
पुणे: हडपसर गाडीतळ या मार्गावरील पीएमपीएमएल च्या बसेस मधील वाढत्या चोऱ्या होत असताना अशा चोऱ्यांच्या प्रकरणात २५ आणि ३० वर्षीय २ तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण ५ चोऱ्यांचा तपास लावला आहे.
या प्रकरणी आता पर्यंत एकूण ६ तोळे वजनाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. १८०/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ मधील फिर्यादी हे दि.१४/०५/२०२४ रोजी आळंदी पी एम पी एम एल बस स्टॉप येथे बसमध्ये चढत असताना मोठया प्रमाणात गर्दी होती सदर गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या डावे हातातील सोन्याची बांगडी चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशीत केले होते.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनकडील दामिनी मार्शल वरील महिला पोलीस अंमलदार अनिता घायतडक या दि. १९/१२/२०२४ रोजी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना कात्रज पीएमपीएल बस स्टॉप येथे काळा व हिरव्या रंगांचा टॉप परिधान केलेल्या अशा वर्णनाच्या दोन महिला ह्या संशयितरित्या फिरत असल्याचे दिसुन आल्याने त्यांना त्यांचेवर संशय निर्माण झाल्याने त्यांनी लागलीच मदती कामी तपास पथकातील अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन सदर महिलांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचा नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अनुक्रमे १) दुर्गा अविनाश उपाध्याय वय ३० वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्सजवळ, खडकी पुणे, मुळगाव सरकारी दवाखान्याजवळ, दर्याचे पाठीमागे, बापुनगर गुलबर्गा कर्नाटक २) लक्ष्मी मिवा सकट वय २५ वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्स जवळ, खडकी पुणे, मुळगाव होम मैदान सिद्धेश्वर मंदीराजवळ सोलापुर असे असल्याचे सांगितले सदर संशयित महिलांना सदर ठिकाणी विनाकारण फिरण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तद्नंतर सदर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचे कडे महिला पोलीस अंमलदार धायतडक यांचे समक्ष पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांनी कौशल्य पुर्ण तपास केला असता त्यांनी सांगितले कि, गेले ७ ते ८ महिन्यांपुर्वी त्या दोघींनी स्वारगेटयेथील आळंदी पी.एम.टी बस स्टॉप येथे एका महिलेच्या हातातील बांगडी चोरी केली होती. असे सांगितल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन कडील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर
आरोपीतांनी स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८०/२०२४ भादंविकलम ३७९ प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिला आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन पोलीस कोठडी मधील तपासा दरम्यान त्यांचे कडुन ०४,८८,०००/- रु. किं. चे ६० ग्रॅम वजनाचे (६ तोळे) सोन्याचे दागीने तपासा दरम्यान जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत ते पुढीलप्रमाणे-
१) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं १८०/२०२४ भादंविकलम ३७९ प्रमाणे
२) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं.५०७/२०२४ भा.न्या.सं. कलम.३०३ (२) प्रमाणे
३) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. ४९३/२०२४ भा.न्या.सं. कलम.३०३(२) प्रमाणे
४) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. २९५/२०२४ भा.न्या.सं. कलम.३०३ (२) प्रमाणे
५) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. ४७३/२०२४ भा.न्या. सं. कलम. ३०३ (२) प्रमाणे
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार मोराळे, तनपुरे, घुले, पवार, शिंदे, टोणपे, खेदाड, शेख, चव्हाण, दुधे, महिला पोलीस अंमलदार सिताप, शिंदे, अनिता धायतडक, सांगोलकर यांनी केली