• December 26, 2024
  • No Comment

तरुणाकडून दोन किलो गांजा जप्त;येरवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    येरवडा: येरवडा परिसरातील ताडीगुत्ता येथे स्कुटरच्या डिक्कीमध्ये गांजा ठेवून त्याच्याकडे येणाऱ्यांना विक्री करणार्‍या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली.

    विठ्ठल संतोष गुमाने (वय १९, रा. कंजार भाट वस्ती, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

    पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका जण ताडीगुत्ता येथे गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. ही बातमी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके यांनी वरिष्ठांना कळविली. पोलिसांनी ताडीगुत्ता येथे सापळा रचला. रात्री साडेदहा वाजता एक जण संशयितरित्या तेथे दुचाकीसह आला होता. पोलिसांनी विठ्ठल गुमाने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीच्या डिक्कीमध्ये २ किलो २४ ग्रॅम गांजा मिळून आला.

    सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, विशाल निलख, अमोल गायकवाड, बालाजी सोगे, स्वप्निल घोलप यांनी केली.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *