• December 26, 2024
  • No Comment

दोघा अल्पवयीनांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; सोन्याच्या दागिन्यांसह 90 हजारांचा माल हस्तगत

दोघा अल्पवयीनांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; सोन्याच्या दागिन्यांसह 90 हजारांचा माल हस्तगत

    पुणे: तळजाई वसाहतीत घरफोडी करुन सोन्याचे दागिने चोरुन नेणार्‍या सराईत बालगुन्हेगारांना पकडून सहकारनगर पोलिसांनी सोन्याचे दागिन्यांसह ९० हजार रुपयांचा माल हस्तगत केला.

    तळजाई वसाहतीतील बळवंत तांबे गल्लीतील घराचा दरवाजा उघडून कपाट उचकटून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने १० डिसेंबर रोजी चोरुन नेले होते. सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्याच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली केली़ ही घरफोडी तळजाई वसाहतीतील रेकॉर्डवरील बाल गुन्हेगार याने केली आहे. तो सध्या एका रिक्षामध्ये बसलेले असून त्याच्याकडे सोन्याचे दागिने आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे पालकांच्या समक्ष चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला. त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने असा ९० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत यांनी केली आहे.

    Related post

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…
    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *