- December 26, 2024
- No Comment
अल्पवयीन दुचाक्या चोरणा-या मुलाला पकडून दोन दुचाकी वाहने हस्तगत, भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
पुणे: भारती विद्यापीठ पोलीसांनी मौजमजेसाठी दुचाक्या चोरणा-या मुलाकडुन दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत. आणि या मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.
या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस स्टेशन अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरांबाबत माहीती घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालक हा चोरीची गाडी घेवुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमुद बालकास त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी सह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली असुन नमुद विधीसंघर्षित बालकाकडे आणखीन केलेल्या तपासामध्ये आणखीन एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे, त्याच्याकडून खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत.
१, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५९४/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) २, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७२७/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमाले, सागर बोरगे, मंगेश पवार, चेतन गोरे, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.