संतापजनक! रक्षकच बनला भक्षक,पाच वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग

संतापजनक! रक्षकच बनला भक्षक,पाच वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग

लोणावळा: रक्षकचं बनला भक्षक बनल्याचं चित्र लोणावळ्यामध्ये दिसून आलं आहे. पोलिसाने कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. लोणावळ्याच्या पोलिसाचे दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनल्याचं दिसून आलं आहे. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले आहेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार काल (बुधवारी) नाताळ दिवशीचं घडला. 

 

नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिलं. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नराधम पोलिस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

चिमुकल्या मुलीच्या आजीने सांगितली सविस्तर हकीकतः

आम्ही विसापूरच्या पायथ्याशी राहतो. आमचं तिथं घर आहे. आमचा छोटी मुलगी तिथं वाळूच्या ढिगाऱ्यावरती खेळत होती. मी त्या पोलिसाला जेवायला दिलं, त्यानंतर मी शेतावर गेले, मुलगी तिकडे खेळत होती, आणि माझी सून आणि भाची घरामध्ये स्वयंपाक बनवत होत्या. माझी सून जेव्हा काऊंटरजवळ आली तेव्हा त्या लहान मुलीने आपल्या आईकडे येऊन सांगितलं, त्या पोलिस काकांनी मला मागं नेलं आणि माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातला. ती रडत होती, आणि घाबरली होती. सुनेने आणि माझ्या मुलाने मला फोन केला. मी घरी आले. तेव्हा माझ्या मुलाने मला सर्व घटना सांगितली. त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. त्यांनी विचारलं काय झालं, तेव्हा त्यांना सर्व माहिती दिली, जर कायद्याचे रक्षक असं वागतं असतील तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असं त्या चिमुकल्या मुलीच्या आजीने सांगितलं आहे. 

 

खाकी घातलेल्या त्या नराधम पोलिसांनी दारू पिलेली होती. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कायद्याचं रक्षण करणारे लोक जर असे गरिबाची छेड काढायला लागले तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल देखील त्या चिमुरड्या मुलीच्या आजीने उपस्थित केला आहे.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *