• December 26, 2024
  • No Comment

चक्क भरदिवसा बाजारतळावर तरुणावर वार करुन टोळक्यान माजविली दहशत, वाघोलीतील धक्कादायक प्रकार

    वाघोली: वाघोली आव्हाळवाडी रोडवरील बाजारतळाजवळ भर दिवसा टोळक्याने येऊन तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. हवेत शस्त्रे फिरवत आरडाओरडा करुन दहशत माजविली.

    याबाबत अदित्य दीपक कांबळे (वय १८, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओम दादाराव मस्के (वय १९, रा. दुबेनगर, वाघोली) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार यश माणिक शिरसाठ (रा. आव्हाळवाडी), निखील कांबळे (रा. जे जे नगर, वाघोली), करण चव्हाण (रा. कटकेवाडी), प्रसाद मस्के, साहील राठोड, प्रथमेश श्रीखंडे व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोली आव्हाळवाडी रोडवरील बाजारतळाजवळ मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अदित्य कांबळे व त्याचा मित्र रोहन जाधव हे मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून तीन मोटारसायकलवर आरोपी आले. ओम मस्के याने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन हातातील कोयत्याने फिर्यादीच्या खाद्यांवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. इतरांनी फिर्यादीचा पाठलाग करुन शिवीगाळ करत धमकी दिली. हातातील शस्त्रे हवेत फिरवत दहशत निर्माण करुन मोठमोठ्याने आरडाओरडा करत पळून गेले. पोलीस हवालदार मोराळे तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *