• December 26, 2024
  • No Comment

पुण्यातील ‘त्या’ बोगस शाळेवर गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांना मारहाण, फीसाठी आर्थिक पिळवणूक

पुण्यातील ‘त्या’ बोगस शाळेवर गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांना मारहाण, फीसाठी आर्थिक पिळवणूक

    पुणे: पुण्यातील मांजरी येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल शाळा बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, या शाळेविराधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या शाळेच्या मान्यतेची कागदपत्रे बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली, या बोगस शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.

    या शाळेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे शाळा मालकाच्या अडचणी वाढल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वी मॅरेथॉन इंटरनॅशनल शाळेकडे शासनाची मान्यता नाही, यूडायस क्रमांक नाही, ही बाब समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं पालकांच्या निदर्शनास आले. एवढंच नाही तर, विद्यार्थ्यांना मारहाण, शाळेच्या फीसाठी आर्थिक पिळवणूक अशा तक्रारी पालकवर्गाकडून करण्यात आल्या. या सर्व प्रकारची गंभीर दखल जिल्हा परिषद विभागाने घेतली आणि त्वरीत पाऊलं उचलण्यास सुरूवात केली. या सर्व पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शाळा व तक्रारदार सुनावणी घेतली.

    यासंदर्भात शाळेला विचारणा केली असता, त्यांनी कागदपत्रे दाखवली. कागदपत्रांची पडताळणी केली असता शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर शिक्षण विभागानं शाळेला आपले म्हणणं मांडण्याची संधी दिली. १५ दिवसांमध्ये शाळेची मुळ कागदपत्रे मंत्रालयातून प्राप्त करून सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, १५ दिवसांच्या मुदतीनंतरही शाळा आपली कागदपत्रे सादर करू शकली नाही.

    या सर्व प्रकरणानंतर शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी हवली गट शिक्षणधिकाऱ्यांना बोगस शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार शाळेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गुन्हा दाखल केल्यानंतर शाळेची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली. तसेच राज्यात आणखीन किती बोगस शाळा आहेत त्याची चौकशी शिक्षण विभागाने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *