- December 26, 2024
- No Comment
नवरा गेल्याचं दु:ख झालंय, पण जवळच्या व्यक्तीने मोहिनीच्या अफेअरचं बिंग फोडलं, पहा सविस्तर घटनाक्रम
पुणे: भाजपचे विधान परिषदेचे आमदार, ओबीसी नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येने पुण्यासह राज्य हादरून गेले होते. मॉर्निंक वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर सतीश वाघ यांच्या हत्येला पत्नी मोहिनी वाघ यांच्या अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले.
हल्लेखोरांनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या अंगावर जवळपास ७२ वार करण्यात केले. सतीश वाघ हे दारू पिऊन मोहिनी वाघ यांना सतत त्रास देत होते तसेच प्रेमसंबंधात आड येत होते, त्यामुळे मोहिनी यांनी ५ लाखांच्या हत्येची सुपारी हल्लेखारांना दिली, अशी धक्कादायक माहिती बुधवारी रात्री उशिरा पोलिसांच्या तपासात समोर आली होती.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले, त्यावेळी पतीच्या जाण्याने आपल्याला अतीव दु:ख झाल्याचे नाटक करून पतीसोबत किती छान जमायचे, त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले. यादरम्यान दर काही मिनिटांनी ती मोठ्याने रडायची. आपल्या रडण्याने आणि आक्रोशाने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही, असे मोहिनीला वाटले.
मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तीनींच पोलिसांना अक्षय जवाळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला. तेव्हा मुख्य आरोपी अक्षय जावळकर फरार होता. अक्षयचे फरारी असणे, हे संकेत त्याचा हत्येतील सहभाग पक्का असल्याचे पोलिसांना वाटले. त्यानुसार पुढील काही दिवसांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला.
अक्षयने जावळकरने चौकशीत सविस्तर माहिती:
पोलिसांच्या सखोल चौकशीत अक्षय जावळकरने मोहिनी हिच्यासोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती दिली. दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी नाताळादिवशी २५ डिसेंबरला मोहिनी वाघ हिला अटक केली.
कधीपासून प्रेमसंबंध, हत्येच्या गुन्ह्यापर्यंत सविस्तर प्रकरण:
३२ वर्षीय अक्षय जावळकर हा पेशाने अभियंता (इंजिनिअर)… तो मोहिनी वाघ यांच्या शेजारीच भाड्याच्या खोलीत राहायचा. तिथेच दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. दोघांच्या प्रेमात सतीश वाघ यांचा अडसर येत होता. दरम्यानच्या काळात सतीश वाघ हे सतत दारू पिऊन मोहिनीला मारहाण करू लागले. त्याचमुळे संतापून मोहिनी आणि अक्षयच्या साथीने त्यांचा काटा काढायचे ठरवले.