• December 26, 2024
  • No Comment

पुण्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सापडला साताऱ्यामधील खून प्रकरणातील सराईत आरोपी; पहा सविस्तर

    पुणे: पुण्यामध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई कडक केली आहे. अशातच सहकारनगर परिसरात कारवाई सुरू असताना सांगली जिल्ह्यातील रोहन फाळके याच्या खून प्रकरणातील आरोपीला वाहतूक पोलिसांकडून पकडण्यात आले आहे.

    गणेश मळेकर (रा. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध बिबवेवाडी परिसरात कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत होता. दुचाकीवर तिघे जण होते. वाहतूक पोलिसांना पाहताच मळेकर पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सांगलीतील तासगाव परिसरात झालेल्या रोहन फाळके याच्या खून प्रकरणातील तो पसार आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

    फाळके याचा खून करुन पसार..

    मळेकर हा फाळके याचा खून करुन पसार झाला होता. झटापटीत त्याच्या पायाला जखम झाली होती. पुण्यात आल्यानंतर त्याने एका दुचाकीस्वाराला सोडण्याची विनंती केल्याची माहिती मळेकरने पाेलिसांना दिली. सहकारनगर वाहतूक विभागातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर, पोलीस कर्मचारी स्वप्नील कदम, सागर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी मळेकरला सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *