पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन; लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन; लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    लोणावळा: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. सचिन सस्ते असं त्या पोलिस कर्मचाऱ्यांचं नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.

    त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी तो एसआरपीएफ मधून पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू झाला आहे, यापूर्वी त्याने असे काही प्रकार केलेत का? याचा ही तपास सुरु आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    पोलिसांनी दिली सविस्तर माहिती: 

    या पोलिसाला आपण एका दिवसाकरता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं, काल 25 डिसेंबर होता. नाताळची सुट्टी असल्यामुळे जादाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं, त्यांना विसापूरच्या पायथ्याखाली बंदोबस्त दिला होता. त्या ठिकाणी गर्दी होते. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अशी तक्रार आल्यानंतर आम्ही तिथे गेलो. त्या पोलिसाला ताब्यात घेतलं. त्याची मेडिकल तपासणी झाली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे.

     

    या घटनेतील पीडित मुलगी आहे, तिला देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तिने देखील याबाबतची सविस्तर दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात आपण गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये योग्य ती कलम लावण्यात आलेली आहेत. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस कर्मचारी आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याची चाचणी करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांनी याआधी असे काही प्रकार केले आहेत का, अशा काही घटना घडलेल्या आहेत का याची तपासणी सुरू आहे.

    ही घटना घडली त्यावेळी त्यांनी मद्य प्राशन केलेलं होतं, त्याची तपासणी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी आपण काहींना बाहेरून बोलवतो. त्यामधील ते एक होते. लोणावळा मुख्यालयातून तो पोलीस कर्मचारी आलेला होता. या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे, त्यासंबंधीची प्रोसेस सुरू आहे. जशा बाबी समोर येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. या घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू करत आहोत, अशी माहिती लोणावळ्याचे डीवायएसपी राजेंद्र माने यांनी दिली आहे.

     

    पहा काय आहे सविस्तर प्रकरण

    https://maharashtracrimewatch.com/?p=13389

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *