• February 20, 2025
  • No Comment

एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अलंकार पोलिसांनी केले गजाआड

एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अलंकार पोलिसांनी केले गजाआड

    पुणे : एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अलंकार पोलिसांनी गजाआड केले.सुमीत उर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजू आसावरे (वय १९), अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे (वय २२, दोघे रा. किष्किंदानगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून तलवार, दुचाकी, दोन साेनसाखळ्या, पेडेंट असा दोन लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    आठवड्यापूर्वी शनिवार पेठेत राहणारा एक तरुण सकाळी डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. त्या वेळी तरुणाला तलवारीचा धाक दाखवून चोरटे आसावरे आणि खंदारे यांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली होती. त्यांच्याबरोबर आणखी एक साथीदार होता. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. डीपी रस्त्यावर लूटंमारीची घटना घडल्यानंतर या भागात सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट उडाली होती

    या घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. डीपी रस्ता, कर्वेनगर, कोथरूड भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनंतर आराेपी आसावरे, खंदारे यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्य मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता राेकडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शांभवी माने यांनी ही कारवाई केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *