• February 20, 2025
  • No Comment

बेकायदेशीरपणे पिस्तुल व जिवंत काडतुसे बालगणारा आरोपी जेरबंद त्याच्याकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे जप्त

बेकायदेशीरपणे पिस्तुल व जिवंत काडतुसे बालगणारा आरोपी जेरबंद त्याच्याकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे जप्त

    पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अभिषेक तिक्क्या रेड्डी (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहसीन अत्तार यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे अभिषेक पिस्तुल घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला हे पिस्तुल देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

    बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी शुभम शिवलिंग कुंभार (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रीतम फरांदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील तुपे चाळ चिंचेच्या झाडाजवळ दोघेजण शस्त्र घेऊन आल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुभम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *